Uncategorized

माणिकराव पाटीलबा वणे : गावाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे एक आदर्श समाजसेवक

Aditya chandramani Wane
द्वारा Aditya chandramani Wane रोजी November 9, 2026

एखादा भला- चांगला माणूस राजकारणाच्या मदतीने समाजकारण करील, तर समाजाला पुढे घेऊन जाणारा, किंवा पुढारी होतो. चांगला नेता होतो. आणि तोच माणूस राजकारणविरहित केवळ समाजाची सेवाच करील, तर ‘महात्मा’ पदास प्राप्त होतो. कुठलीही असूया न ठेवता, कितीही नीतिमानतेने राजकारणात राहिलं, तरी त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची समीक्षा करतांना, तिच्या गुणांसह मर्यादांचीही मीमांसा होतेच.

मला एक कर्बगार, चांगला माणूस जवळून पाहण्याची संधी मिळाली. स्व. माणिकराव पाटीलबा वने… नात्याने आमचे व्याही. आमच्या गावाला त्यांच्यामुळे ओळख होती. कुठंही अनोळखी ठिकाणी विषय निघाला, “की माणिकराव पाटलांच्या गावचे काय?” असे त्यांचे समवयस्क ओळख दाखवत असतात. ते सतत वीस-पंचवीस वर्षे आमच्या केकत जळगावचे सरपंच होते. १२ ते १७ हे पाच वर्षे पैठण पंचायत समितीचे सदस्य होते. पुढे ‘शरद सहकारी साखर कारखाना चोंढाळा’च्या उभारणीत संस्थापक अध्यक्ष, श्री. चंद्रकांत घोडके यांचेबरोबर त्यांचा सक्रिय सहभाग होता. कारण या कारखान्याच्या जागेची अर्ध्यापेक्षा जास्त जमीन ही केकत जळगाव शिवारातीलच आहे. ‘संत एकनाथ सहकारी साखर कारखान्या’वरही श्री. भास्करराव वाघ यांच्या निमित्ताने गावासाठी त्यांनी प्रतिनिधित्व मिळवलं होतं. पक्षीय राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता. मात्र, ‘चांगला’ उमेदवार पाहून, सगळा गाव त्यांच्या पाठीशी उभा करण्याचे ‘कसब’ त्यांच्या ठायी होते. सदासर्वकाळ आम्ही कुणाचे बांधील नाहीत. म्हणून आम्हाला कुणीही गृहीत धरू नये. असा तालुकाभरातल्या पुढाऱ्यांमध्ये त्यांच्याबाबतीतील संदेश गेलेला होता. गावातील सगळी ‘जाणती माणसं’ एकाच सतरंजीवर बसवण्याचा व एकत्रित निर्णय घेण्याचा दिलदारपणा व मनमोकळेपणा हे त्यांचे अंगिभूत गुण होते. गावातील छोटेमोठे तंटेबखेडे गावातच समजूत घालून मिटविण्याची किमया त्यांच्या अंगी होती. म्हणून ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ कायद्याकर्वी येण्याच्या किती तरी आधीपासून ते गावाचे ‘अनभिषिक्त’ न्यायपंच होते. गावातील भांडण बाहेर गेलं, तर त्यांना तो अपमान वाटायचा. गावातीलच काय, बाहेरील मित्रपरिवारातील मातब्बर आसाम्यांच्याही वादविवादांचा ते निवाडा करायचे. इतकी त्यांची न्यायबुद्धी वाखाणण्याजोगी होती.

ग्रामीण व्यवस्थेशी संबंधित तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी-पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असायचे. माजी गृह राज्यमंत्री स्व. कल्याणराव पाटील आणि माणिकराव पाटील यांची घनिष्ठ मैत्री होती. जो पर्यंत स्व. कल्याणराव पाटील शिसोदे तो पर्यंत गावात वीज आणली होती

लेखक उद्धव दराडे (सेवानिवृत्त मुख्यधापाक )